
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
________________________________
अहमदपूर:- दि:- 26 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.
अहमदपूर येथील छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप मधील सर्व सदस्यांनी सकाळी सात वाजता योगा मैदानावर भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री बालाजी दुगाने आणि गणेश वाघमारे यांनी उद्देशिकेचे वाचन केले आणि त्याच्या पाठीमागे सर्व सदस्यांनी सामूहिक वाचन केले
याप्रसंगी ग्रुपचे सन्माननीय सदस्य माननीय एल डी कांबळे सर आणि माधव तिगोटे सर यांनी भारतातील पवित्र बौद्ध स्थळांना भेटी देऊन तेथील संस्कृतीचा अभ्यास करून ते आल्यामुळे त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ आणि भारतीय संविधान हे ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला