
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील पथ्रोट येथे २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.पथ्रोट येथील कलालपुरा येथे राहणारी ६० वर्षीय वृद्ध महिलेला येथीलच विशाल जगन्नाथ नांदुरकर वय २३ वर्ष राहणार पथ्रोट या युवकाने घरात काही दाखवण्याच्या बहाण्याने नेले असता तिला एका घराच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला महिलेने याचा विरोध केला असता सदर आरोपी युवकाने त्या वृद्ध महिलेचे तोंड दाबले व गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह रजाई खाली लपवून ठेवला.कलालपुरा येथील नागरिकांना परिसरात सदर महिला दिसून न आल्याने त्यांनी महिलेचा शोध घेतला असता ती एका घरात मृत अवस्थेत आढळून आली.त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करीता पाठविला असता घटनेतील आरोपी विशाल जगन्नाथ नांदुरकर याला अटक करून त्याच्याविरुद्ध कलम ३०२,३७६ नुसार बलात्कार व हत्या करण्याबाबत गुन्हा दाखल केला.घटनेची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना होताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली.