
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर :- संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर व कै. बळीराम पाटील प्राथमिक शाळा भोपळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एन मामडे साहेब यांनी भुषविले.प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.माधव भोपाळे यांनी संविधान दिन व संविधानाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान या विषयावर भाषणे केली.प्रथम, दुसरे व तिसरा आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.सामुहीक संविधान वाचन करण्यात आले.आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.