
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
मारतळा :- मारतळा येथील ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.श्री.संजय पाटील ढेपे सर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त त्यांचे मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षीका यांनी संविधान दिनाचे महत्त्व व संविधान वाचन करण्यात आले.यावेळी उपस्थित प्रिया सामल मॅडम,त्रिमाले मॅडम,चांगूना मॅडम, कुलकर्णी मॅडम, जोशी सर,तारू सर, सुनील तारू, आनंदा जाधव, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.