
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा प्रतित्माक पुतळ्याचे दहन करण्यात आले.सर्व जग श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचे स्थान देत असून राज्यपाल महोदय नेहमीच शिवाजी महाराज यांच्या अपमान करून बोलत आहेत.त्यामुळे त्यांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्यात यावे तसेच गावातील तरुणांनी कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी श्री.हनमंतराव पाटील (शिवसेना सर्कल), श्री बालाजी पा. जाधव, श्री प्रभाकर पा.जाधव, श्री.मोहन पा.जाधव, श्री.संतोष पा.जाधव, श्री.रमेश पा.जाधव,माधव जाधव, संजय पा.ढाले, सुभाष जाधव, रघुनाथ जाधव, योगेश जाधव, आनंदा जाधव, भास्कर जाधव, संजय जाधव, नवनाथ जाधव यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.