
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
———————-
देगलूर प्रतिनिधी ( दि.२७) हिंदुस्तान के इतिहास मे अमर रहेगा तेरा नाम, नही जरूरत कोई स्मारक की, स्मारक ही तेरा नाम.
दि.२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहिद तुकाराम ओंबळे,शहीद हेमंत करकरे,शहीद अशोक कामटे,शहीद विजय साळसकर,शहीद संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह ३४ परदेशी नागरिकांसह कमीत कमी १९७ जण ठार झाले तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले तर उर्वरित एक दहशतवादी म्हणजेच अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते.
या हल्यात शहिद झालेल्या शूरवीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देगलूर येथील शहिद भगतसिंग चौकात विर सैनिक ग्रूप देगलूरच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विर सैनिक ग्रुपचे सचिव संतोष मनधरणे,विर सैनिक ग्रुपचे शहरअध्यक्ष अमोल एशमवार, उपाध्यक्ष रवि काळे सर,कार्याध्यक्ष इर्शाद पटेल,कोषाध्यक्ष महादेव उप्पे, श्रीनिवास पाटील,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील,दिगंबर कौरवार इसाक पटेल,ताहेर देसाई,साई गंदपवार, शशांक पाटील मुजळगेकर,प्रमोद मोरे,शत्रुघ्न पैलवार व असंख्य नागरिक उपस्थित होते.