
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-दर्यापूर मागासवर्गीय वसतिगृह संघटना मार्फत दर्यापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद पार्क येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान दिन साजरा कटण्यात आला.याप्रसंगी दर्यापूर शहरात संविधान सन्मान रॅली काढून संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी दर्यापूर तालुका मागासवर्गीय वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष कुलदीप काळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुलदीप चौधरी,इंजी नितेश वानखडे,मंदाताई टोळे,मारोती भोसले,गजानन भोसले,महादेव डाखोडे,श्रीमती चक्रे आदी उपस्थित होते.यावेळी दर्यापूर शहरातील आनंद छात्रालय,दर्यापूर,कमला नेहरू मुलींचे वसतिगृह दर्यापूर,संत गाडगेबाबा वसतिगृह दर्यापूर,झामाजी वाकपांजर वसतिगृह दर्यापूर,आर.झेड.वाकपांजर वसतिगृह दर्यापूर,काशीबाई जाणे मुलींचे वसतिगृह दर्यापूर याचे संस्था चालक,अधिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन रामदास हेरोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर वाकपांजर यांनी केले.या कार्यक्रमाला प्रियांका निचळ,सानिका जावरकर यांनी विशेष सहकार्य केले.