
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवदा येथे बरखास्त झालेली ग्रामसभा शुक्रवारी दि.२५ नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली.मात्र ग्रामसभेकरिता असलेले प्रोसेडींग रजिस्टर गायब असल्याने ग्रामसभेने घ्यावयाची कामे कुठे घ्यावीत;असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.दरम्यान प्रोसेडिंग रजिस्टर सरपंच व सचिव यांनीच गहाळ केल्याची ओरड करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.
शुक्रवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिभा माकोडे होत्या.दरम्यान ग्रामसेवक राजेश किटूकले हे रजेवर गेल्याने सभेचे कामकाज ग्रामविस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी व ग्रामविकास अधिकारी अरुण रायबोले यांनी सांभाळले.परंतु ग्रामसभेकरिता आवश्यक असलेले प्रोसेडिंग रजिस्टर गायब असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत सरपंच व सचिव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी उपस्थित ग्रामविस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी यांनी प्रोसेडिंग रजिस्टर ग्रामपंचायत मध्ये नसल्याचे सांगितले.त्याबाबत तत्काळ ठराव घेण्यात आला आणि ही सभा तहकूब करण्यात आली.पुढील सभा ही प्रोसेडिंग रजिस्टर उपलब्ध झाल्यावर घेण्यात येईल असे सांगितले.त्यामुळे संतप्त गावकरी,ग्रामपंचायत सदस्य व प्रहारचे प्रदीप वडतकर यांनी नागरिकांच्या उपस्थितीत येवदा ग्रामपंचायत कुलूप ठोकले.त्यानंतर प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर,ग्रामपंचायत उपसरपंच मुज्जमील जमादार,सदस्य सुयोग टोबरे,राजेश गणोरकर, रंजीत सोळंके,श्याम ठाकरे,संतोष तिडके,पंकज कैकाडी,ओमप्रकाश शर्मा व मोठ्या संख्येने नागरिकांनी येवदा पोलीस स्टेशन गाठून सरपंच व सचिव यांनी प्रोसेडिंग रजिस्टर चोरल्याची तक्रार ठाणेदार आशिष चेचरे यांना दिली.