
दैनिक चालू वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरात गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रात सुद्धा अव्वल स्थानी असलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड या शैक्षणिक विद्या संकुलाचे अपसुकच नाव सर्वांच्या ओठावर येते..
नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कॉलेजच्या खेळाडूंनी उतुंग यश प्राप्त केले असून यात वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी दीक्षा दत्तात्रय कुरुडे तसेच कृष्णा वसंतराव राठोड ( 96 kg.) आणि हर्ष इंद्रजीत बुरपल्ले ( 87 kg ) वजन गटात या खेळाडूंनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या तीनही खेळाडूची निवड विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धा साठी झाली आहे.
तसेच सॉफ्टबॉल जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कॉलेजला दुहेरी यश प्राप्त झाले असून यात मुलीचा व मुलांचा संघ अनुक्रमे प्रथम आला असून दोन्ही संघाची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे सॉफ्ट बॉल स्पर्धेत दुहेरी यश प्राप्त करून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करून खेळाडूंनी कॉलेजचे नाव लौकिक केले आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत वेगवेगळे खेळांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे यशस्वी खेळाडूचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्रा.कपिल विश्वनाथराव सोनकांबळे तसेच माध्यमिकचे क्रीडाशिक्षक सुशील कुरुडे यांचे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा.सुधीर भाऊ कुरुडे , उपप्राचार्य मा.परशुराम येसलवाड , शालेय समिती सदस्य मा.सूर्यकांत कावळे , मा.एम. पी. कुरुडे , मा.इंद्रजीत बुरपल्ले पर्यवेक्षक मा.माधव ब्याळे , कौठा इन्चार्ज प्रा.सय्यद जमील , माध्यमिकचे पर्यवेक्षक मा.सदानंद नळगे व मा.शिवराज पवळे , प्राथमिकचे पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे , शहाजी आहेर सर , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.सौ. स्वाती कान्हेगावकर , ज्येष्ठ प्रा. वसंत राठोड , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.कैलास पतंगे , शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव , प्रा. दीपक श्रीवास्तव प्रा.ज्ञानेश्वर लुंगारे , प्रा. अमर दहिवडे , प्रा.लक्ष्मण अक्कनगिरे , प्रा.मोरेश्वर निलेश इत्यादी सह सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ प्राध्यापक बंधू आणि भगिनी ज्युनिअर च्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने तसेच माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंचे व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रा. कपिल विश्वनाथ सोनकांबळे व माध्यमिक विभागाचे क्रीडाशिक्षक सुशील कुरूडे यांचे अभिनंदन केले.
सर्वच थरातून यशस्वीतांचे अभिनंदन करून सर्वत्र कौतुक केले जात आहे.