
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव- संभाजी गोसावी.
सातारा जिल्ह्यांतील ३१९ ग्रामपंचायतीचे धुमशान आजपासून रंगणार आहे ऑक्टोंबर ते डिसेंबर या महिन्यांच्या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वांत आलेल्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यांत येतील तर १८ डिसेंबरला मतदान होईल त्यामुळे थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. सातारा तालुक्यांतील ३९ , कोरेगांव तालुक्यांतील ५१,वाई ७, खंडाळा २, जावली १५, कराड ४४, खटाव १५, महाबळेश्वर ६, माण ३०, पाटण ८६, फलटण २४, अशा एकूण ३१९ ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यांस आजपासून सुरुवांत होत असून. २ डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यांचा शेवटचा दिवस आहे. ५ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यांची अंतिम तारीख ७ डिसेंबर असून याच दिवशी दुपारी ३ नंतर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर चिन्ह वाटप केले जाणार आहेत. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यांस आज पासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे आता गावागावात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.