
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल -माणिक सुर्यवंशी
———————————————–
देगलूर(दि.३०) शाळेसाठी आगारात गाड्या असून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी वेळेवर गाड्या थांबत नसून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.वारंवार देगलूर आगारातील व्यवस्थापकांना निवेदन देऊनसुद्धा काहीच फरक पडत नसल्यामुळे ग्रामपंचाय कार्यालय वझरगा यांच्याकडून व दैनिक चालू वार्ता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा एकदा आगार व्यवस्थापक अमर पाटील यांना निवेदन देऊन वझरगा येथे बस थांबविण्याची मागणी केली आहे.
वझरगा येथून दररोज ३५ ते ४० विद्यार्थी शिक्षणासाठी देगलूरला येतात परंतू देगलूर आगारातील कर्मचारी वारंवार सांगून सुद्धा बस थांबवित नाहीत त्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे परंतू देगलूर आगाराला कसल्याच प्रकारचा फरक पडत नाही व देगलूर आगारात विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी गाड्या असूनसुद्धा प्रवाशी आसन पकडून बसतात व विद्यार्थ्यांना मात्र बसण्यासाठी जागा नसल्यामुळे विद्यार्थी पास काडून काय उपयोग.
यासाठी वझरगा ग्रामपंचायतीच्या वतीने विद्याथर्यांची गैरसोय होऊ नये व बस थांबवून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेला जाण्यासाठी मदत करावी असे निवेदन देण्यात आले आहे.