दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी शहरातील एका मोठ्या कापूस व्यापाऱ्याकडे आंध्रप्रदेशातील एका व्यक्तीने दोनशे कापसाच्या गाठी विकल्या व त्यांचे पैसे अजून पर्यंत न मिळाल्याने तो व्यक्ती व त्याच्या पत्नीने कापूस व्यापाऱ्याच्या घरासमोर ठिय्या मांडला आहे.
माहितीनुसार,अंजनगाव शहरातील एका व्यापाऱ्याने आंध्रप्रदेशातील कर्नल जिल्ह्यातील आदोनी येथील रहिवासी रविप्रकाश तायप्पा सरोदे यांच्याकडून १८ मार्च २०१८ रोजी कापसाच्या शंभर गाठी ३६ हजार पाचशे रुपये प्रति गाठ प्रमाणे विकत घेतल्या होत्या.२ मे २०१८ रोजी १०० गाठी त्याच भावाने विकत घेतल्या.परंतु त्या मालाचा मोबदला रविप्रकाश सरोदे याला न मिळाल्यामुळे त्यांनी वेळोवेळी येथील व्यापाऱ्यासोबत संपर्क केला.परंतु,त्याला मोबदला मिळाला नाही.उसनवारी असल्याने त्यांचे घरही गेले.त्यामुळे रविप्रकाश सरोदे व त्यांची पत्नी जया यांनी त्यांच्या गावापासून ४०० किलोमीटर दूर अंजनगाव सुर्जी गाठले.
मोजकेच पैसे असेपर्यंत त्यांनी येथील लॉजवर मुक्काम केला.परंतु,पैसे संपल्यानंतर व्यापान्याच्या घरासमोर त्यांनी ठिय्या मांडला.त्या व्यापाऱ्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने ते गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून ठाण मांडून आहेत.व्यापाराच्या घराला कुलूप लागलेले असून त्याचा कोणालाही ठाव ठिकाणा नाही.८ नोव्हेंबरला रविप्रकाशाने याच ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता.त्यांचे प्राण वाचले.कडाक्याच्या थंडीत बसलेल्या या दाम्पत्याला काही नागरिकांनी मदत केली आहे.अहिंसेच्या मार्गाने त्याचे आंदोलन सुरू आहे.या दाम्पत्याला कधी न्याय मिळणार,अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.वरिष्ठ पोलिस अधिकान्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
