
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर :- सोमवार दिनांक 28/11/22 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह कोल्हापूर येथे सायंकाळी 5:00 वाजता डाॅ.संजय वाघंबर (अहमदपूर) लातूर यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून अरोग्यसेवाअंतर्गत जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले डाॅ.संजय वाघंबर यांच्या सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी डाॅ.संजय वाघंबर यांची निवड करण्यात आली.तसेच हा पुरस्कार घेण्यासाठी महाराष्ट्रातुन 800 शे च्या वर एकुण 950 प्रस्ताव आले होते.त्यामुळे समितीने प्रत्येकाच्यां कार्याची पडताळणी, त्यांची मेहनत अरोग्यसेवा,जनसेवा,शिक्षणसेवा ईत्यादी बाबीवर भर देऊन 50 मान्यवरांची निवड केली त्यात अहमदपुर चे डाॅ.संजय वाघंबर यांची 50 च्या यादीत 27 व्या क्रमांकावर निवड झाली.असे पुरस्कार आयोजन समिती चे अध्यक्ष अनिल माहमने सर यांच्या कडुन समजले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमा सोबतच डाॅ.खंडेराव शिंदे लिखित ‘पकाल्या’ तसेच शकुंतला शिंदे लिखित ‘संघर्ष’ यांच्या आत्मकथन पुस्तकाचे प्रकाशन झाले.या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. सुरेशराव जाधव, माजी आमदार विजया कांबळे, डॉ. राजेंद्र दास, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मळे, सूरज वाघमारे लेखक डॉ. खंडेराव शिंदे, लेखिका शकुंतला शिंदे, डॉ.शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर, डॉ. कपिल राजहंस, प्रा. मिनल राजहंस, चंद्रकांत सावंत, निरंजन शिंदे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शेषराव नेवारे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. पद्माकर तामगाडगे, सुरेश केसरकर, मोहन मिणचेकर, आचार्य अमित मेधावी, रंजना सानप, उद्धव पाटील, डॉ. स्वप्निल बुचडे, डॉ. अविनाश वर्धन ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनाचे काम आयोजक सिध्दार्थ कांबळे सर यांनी पाहिले.