
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी :संभाजी गोसावी
पुणे. राज्यांतील सहा पोलीस ठाण्यात मोक्का खुन, दरोडा,जबरी चोरी घरफोडी चोरीसह २२ गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली. यामध्ये लखन उर्फ महेश पोपट भोसले( रा. वडगाव जयराम स्वामी ता. खटाव जि.सातारा ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीला पुणे येथील मुक्का न्यायालयांत हजर करण्यात येणार असल्यांची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांनी आरोपी भोसले हा घाडगेवाडीत येणार असल्यांची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे व स्वप्नील अहिवळे यांनी सापळा रचून पोपट भोसले हा एका घरासमोर उभा असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली पण त्याला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी भोसलेने पळ काढला होता. पण एक किलोमीटर पाठलाग करुन अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी भोसलेवर दहिवडी पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचे १३ गुन्हे जबरी चोरी एक गुन्हा, दरोडा एक गुन्हा तर म्हसवड पोलीस ठाण्यात घोरपडी चोरीचा गुन्हा, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मोक्कासह दरोडा, घर पुढे चोरी जबरी चोरीचे असे तीन गुन्हे तर बारामती तालुका पोलीस ठाण्यात खुनासह जबरी चोरीचा एक गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यांत दरोडाचा गुन्हा तर वडूज पोलीस ठाण्यांत घरफोडी चोरीचे तीन गुन्हे सदर आरोपींवर दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखा बारामती पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूंन कौतुक