
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी बीड – संभाजी गोसावी
संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात आणि तरुणाईला चांगलेच वेड लावण्या लावणारी प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील हिचा बीड जिल्ह्यांतील राजुरी शिवारांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमिंत्त गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांत गौतमी पाटील हिचे स्टेजवर आगमन होताच… सरकार तुम्ही केलय मार्केट जाम या गाण्यांवर प्रेक्षक थेट स्टेजवर चढल्यांमुळे एकच गोंधळ उडाला. तर काही प्रेक्षकांकडून दगडफेक करण्यांत आली. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांत बीडच्या प्रेक्षकांनी चांगलाच धिंगाणा घातला. यामध्ये गौतम पाटील सुरक्षित होत्या. तर कार्यक्रम आयोजकांकडून बंद करण्यांत आला. प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील यांच्यावर लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करण्यांवरुन अनेक वेळा टीका झाली होती. पण गौतमी पाटील हिने महाराष्ट्रांच्या तरुणाईला चांगलेच वेड लावले आहे. मात्र बीड जिल्ह्यांत तिच्या कार्यक्रमांत प्रेक्षक थेट स्टेजवर चढले आणि एकच धिंगाणा झाला. तर काही प्रेक्षकांकडून दगडफेक करण्यात आली. मात्र सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे तरीही हा कार्यक्रम कसा आयोजित केला असा आता प्रश्न चांगलाच निर्माण झाला आहे.