
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
बिलोली शहरातील कुंडलवाडी रोड लगत असलेले बागेतील हनुमान मंदिर परिसरात जवळील गटारी मधून काढलेली गाळ नगरपालिकांच्या निष्काळजीपणामुळे जमीन सपाट दिसत आहे. कुंडलवाडी रोड लागत असलेल्या बागेतील हनुमान मंदिर प्रांगणात लगत असलेल्या पुलाजवळील गाळ काढून दोन ते अडीच महिने होत आहे. अद्यापही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून अजून उचललेली नसून अर्धी गाळ भुई सपाट झालेली आहे. गावातील नागरिकांनी मंदिराला जातेवेळेस याचा त्रास सहन करावा लागत आहे. गटारी मधून काढलेली गाळ रस्त्यात असल्यामुळे याचा खूप त्रास होत आहे मंदिराला जाणाऱ्या भाविक भक्तांना सहन करावा लागत आहे. वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होत आहे . व तसेच रोगराई पसरत आहे अस्वच्छता निर्माण झालेले आहे बिलोली शहरांमध्ये नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सांगून सुद्धा याचा काही उपयोग होत नसल्याकारणाने भाविक भक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. जेसीबीच्या साह्याने काढलेली पुला खालची रेतीची घाण काढण्यात आली .अद्यापही नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी ही रेतीची घाण उचलली नाही. नगरपालिकांच्या टेंडर घेऊन काम करणाऱ्यांना आशीर्वाद आहे तरी कुणाचा हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. नगरपालिकेच्या सी ओ साहेबांनी या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. घरोघरी नळाच्या पाण्याची सुविधा नसल्याकारणाने बिलोली शहरातील संपूर्ण नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहे .