
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी- श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी येथील पंचायत समिती कार्यालयात प्रहार अपंग संघटनाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ना. संजय भाऊ राठोड पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून दिव्यांग बांधवांशी संवाद साधला याप्रसंगी ना.राठोड यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तथा जिल्हा नियोजन निधीतून भारिव निधीची तरतूद करणार असल्याचे सांगितले तथा दिव्यांगाच्या मुलाची २५ वर्षे झाल्यावर त्याच्या योजना बंद केल्या जातात आर्णी मध्ये १४९ तर जिल्ह्यात हजारो दिव्यांगाच्या योजना बंद झाले आहेत त्यासाठी ही अट रद्द करून सर्वच दिव्यांग यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणार असल्याचे व राज्य शासनाने दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे,ज्याद्वारे दिव्यांगाना योजनांचा सुलभ आणि त्वरित लाभ मिळणे शक्य होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
राज्य सरकार दिव्यागांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून त्यांना सन्मानाची वागणूक आणि जीवन जगता यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आधारित लघु उद्योगासाठी सुद्धा जिल्हा नियोजन निधीतून मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव पाटील सर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजुदास जाधव डॉ. विष्णू उकंडे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव तालुकाप्रमुख जीवन जाधव माजी सभापती अनुप जाधव तहसीलदार परसराम भोसले साहेब गटविकास अधिकारी वाघमारे मॅडम पोलीस निरीक्षक पितांबर जाधव साहेब, युवराज राठोड, दिलीप राठोड, चंद्रशेखर जाधव, अतुल मुंनगिनवार ,अविनाश पवार ,दिगंबर बोरकर ,उपस्थित होते सदर या कार्यक्रमात यशस्वी ते साठी आकाश दुपारते तालुका समन्वयक घनश्याम बनसोड सचिव प्रशांत शिंदे ,ज्ञानेश्वर कुडवे, सुशोधन खोडे चंदूसिंग जाधव यांनी परिश्रम घेतले