
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;:;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा सर्कल मधील तीन ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत आहे यामध्ये पालोदी बेलोरा (वन) सावळी सदोबा येथील ग्रामपंचायत समावेश आहे सर्वच ठिकाणी सरपंच व सदस्य यांच्या लढतीचे वातावरण निर्माण झाले आहे, सावळी सदोबा येथील ग्रामपंचायत मध्ये ११
सदस्य जागेसाठी २३ उमेदवार लढत आहे सरपंच पदाचे उमेदवार आमने सामने आहे ग्रामपंचायत अविरोध निवड करण्यासाठी प्रयत्न केले पण निश्चित झाले नसल्याने सर्वसामान्य जनतेला निवडणुकीसमोर जाण्याची गरज आले आहे सावळी ग्रामपंचायत मध्ये ४ वार्ड संख्या आहे २९५० मतदार असल्याचे समजले आहे, पालोदी येथील ग्रामपंचायत मध्ये फक्त एकच सरपंच पदाकरिता चुरशीची लढत होत आहे. बेलोरा (वन) ग्रामपंचायत मध्ये ७ सदस्य निवडणुकीसाठी १४ उमेदवार उभे राहिले आहे तर सरपंच पदा करिता लढणतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. सावळी –
इचोरा जि.प. गणा मधील ३ ग्रामपंचायतीच्या निवडणूक जिल्हा परिषदची तालीम समजली जाते १८ डिसेंबरला मतदान आहे तर १९ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे राजकीय नेत्यांची लक्ष निकालाची वाट पाहत आहे.