
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे .दोन वर्षानंतर यात्रा असल्यामुळे भाविकांची व प्रवाशांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने योग्य नियोजन केले असून त्यासाठी नागरिकांनी सुखकर प्रवासासाठी एसटीचाच प्रवास करावा असे आव्हान कंधार आगाराचे आगार प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी केली आहे
मागील दोन वर्षापासून कोरोना काळात संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी प्रशासनाने यात्रा उत्सव साठी बंदी होती कोरोना प्रादुर्भाव संपल्यामुळे शासनाने यावर्षी यात्रेसाठी नियोजन केले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्वच आगाराने सुसज्ज व स्वच्छ बसेसची व्यवस्था केली आहे त्यासोबतच अमृत महोत्सव मुळे यावर्षी ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले असून त्यासोबतच सर्वांनी याचा लाभ घ्यावा २०१९ मध्ये कंधार आगाराच्या एकूण १३६० फेऱ्या कंधार ते माळेगाव झाल्या होत्या .एकूण किलोमीटर ६४ हजार ९१५ झाले होते एकूण २५ वाहने यात्रेकरू साठी सोडण्यात आले होते .त्याचे आगाराला २३ लाख ८९ हजार ६०८ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.यावर्षी ही कंधार आगाराने दोन वर्षाच्या कालखंड यात्रेचा बंद असल्यामुळे विशेष नियोजन करण्यात आले आहे .यामध्ये ८०हजार किलोमीटरचा उद्देश नियोजन असून यासाठी २५००फेऱ्या करण्यात येणार आहेत.त्यासाठी ३५ वाहने वापराचे नियोजन असून ४० लक्ष रुपये उत्पन्नाचे उद्देश पार पाडण्याचा आगारातील सर्व चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय कर्मचारी या यात्रेसाठी परिश्रम घेणार असून या यात्रा कालावधीत १३९चालक १३६ वाहक ४१ यांत्रिक प्रशासकीय कर्मचारी २४चे परिश्रम घेत आहेत. प्रवासाच्या सोयीसाठी माळेगाव येथे यात्रा शेड राष्ट्रीय परीवहन बसेसच्या नियोजनासाठी आखण्यात आली आहे .त्यासोबतच लोहा बस स्थानक व कंधार येथे महाराणा प्रताप चौकात यात्रेकरू साठी शेड टाकण्यात आले आहेत.त्यामुळे जिल्हातीलच नसून महाराष्ट्रातील सर्व यात्रेकरूंनी एसटी महामंडळाच्या या सुखकर प्रवासाचा माळेगाव यात्रेसाठी लाभ घ्यावा असे आवाहन कंधार आगार प्रमुख यांच्या तर्फे करण्यात आले आहे.