
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा – संभाजी गोसावी
जि.माण-खटाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरें यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला.तसेच गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला.बाणगंगा नदीच्या पुलावरुन गोरे यांची गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे ५०फूट खोल दरीत कोसळल्यांची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीवरुन साताऱ्यातील माण-खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला यामध्ये तब्बल ५० फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटण जवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्यासोबत इतरही तिघे होते त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर इतर तिघांना फलटण बारामती रुग्णालयांत दाखल करण्यांत आले आहे. जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत असताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर पोलीस व कार्यकर्ते तातडीने अपघात स्थळी दाखल झाले.