
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : देशात करोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे.मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
या आठवड्यात सलग ३ दिवस करोनाचा प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.त्यामुळे नागरीकांनीही न घाबरता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.