
दैनिक चालू आता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
============================
नांदेड. दिनांक 29 दीपनगर येथील श्री निकेतन हायस्कूलच्या विद्यार्थिनीची तयाकोदे स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाली आहे कु. तेजस्विनी भगवान ताटे या विद्यार्थिनीने लातूर येथे झालेल्या विभागीय तयाकोदे स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला.
पुढील स्पर्धेसाठी तिची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत झाली आहे तिच्या या निवडी बद्दल शाळेचे सचिव श्री कपिल नरवाडे साहेब, सहसचिव डॉ .सौ.एस. एन. राऊत मॅडम, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर, शारीरिक शिक्षक श्री मोगल ए .के .सर, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले
तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिचेआणि शाळेचे शारीरिक शिक्षक व तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन होत आहे