
दैनिक चालू वार्ता अकोला प्रतिनिधी-
___________________
पुढील आदेशापर्यंत गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवू नये, असे न्यायालयाचे आदेश असतानाही जिल्ह्यातील बार्शीटाकळी तहसील अंतर्गत येणाऱ्या पिपळगाव चांभारे, ढाकली, कोथळी व चिंचोली आदी गावांतील अतिक्रमणधारकांना स्थानिक प्राधिकरणाकडून नोटीस देण्यात येत आहेत. त्यांना दिलेल्या नोटीस रद्द कराव्यात, न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण काढू नये, अशी
मागणी समता संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना
दिलेल्या निवेदनातून केली आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे प्रशासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला होता. गायरान जमिनीवर मजूर, अनुसूचित जाती, जमाती, भटके व इतर मागासवर्गीयांनी अतिक्रमण केले आहे, अशा लोकांवर अन्याय होता कामा नये, व शासनाने त्यांना न्याय द्यावा, म्हणून समता संघटनेच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर रोजी इच्छामरणाचा इशारा दिला होता. त्यामुळे शासनाने अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटीस पुढे ढकलल्या. त्यांनी न्यायालयाच्या आदराची मागणी केली. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवू नये, असे न्यायालयाचे आदेश असतानाही तहसीलमधील पिपळगाव चांभारे, ढाकली, कोथळी व चिंचोली आदी गावांतील अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गवई, प्रदेशाध्यक्ष आम्रपाल वाघमारे, शिध्दोधन गवई, विजेय बावस्कर, अजय सुरडकर, मधुकर गवई, रूपेश सुरडकर यांच्यासह आदी अतिक्रमण धारक उपस्थित होते.