
दैनिक चालू वार्ता मुखेड ग्रामीण प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड :- मौ.चांडोळा येथील आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत आहे,हे दुर्दैवच म्हणावं लागेल आमच, कारण आजही सर्वात मोठी लोकशाही अस्तित्वात असलेल्या या देशामध्ये आम्हांला आमचे मूलभूत हक्क, अधिकार, यापासून आम्हाला वंचित रहावे लागते, आम्हांला आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत,हजारो करोड रुपये खर्च करून शासन मोठं -मोठे सरकारी दवाखाने काढत आहे, परंतु खऱ्या अर्थाने याचा सर्वसामान्य लोकांना, म्हणावा तसा फायदा या ठिकाणी होतांना दिसत नाही, अस्या मोठमोठ्या दवाखान्यात हे कर्मचारी डॉक्टर भरती होऊन लाखो रुपयाची पगार शासनाचा घेणार व त्याच ठिकाणी बाजूलाच आपला स्वतःचा खाजगी दवाखाना टाकून तो स्वतः त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणार व दोन्ही बाजूने पैसे कमवणार,असे व असेच अनेक प्रकार सध्या सर्वत्र खुलेआम चालू आहेत,हे खूप मोठं आमच दुर्दैव म्हणावं लागेल,अगदी असाच प्रकार मौ. चांडोळा या केंद्रामध्ये सुद्धा झाला आहे, त्या ठिकाणी एक महिलेला डिलेव्हरी साठी नेलं जात परंतु त्या ठिकाणी एकही दवाखान्यातील कर्मचारी किंवा नर्स, डॉक्टर उपस्थित नव्हते, किंवा त्या ठिकाणावरून तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात पेशन्ट ला घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स मिळत नाही, जर कदाचित त्या निष्पाप महिलेला त्या ठिकाणी जर काही झालं असत तर याला जबाबदार कोण असत,,
म्हणून येथील सर्व आरोग्यसंबंधित सुविधा द्याव्यात,अशीही मागणी मासची आहे.तसेच त्या ठिकाणी अनेक पदे रिक्त असतांनाहि ती रिक्त पदे भरली जात नाहीत तसे चांडोळा हे सर्कल चे ठिकाण एके काळी आरोग्य संबंधित अनेक पुरस्कार याच चांडोळा येथील आरोग्य केंद्रास मिळाले आहेत,परंतु सध्या त्या ठीक रुग्णांची अतिशय हेळसांड होत आहे, त्यामुळे या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर, निवासी नर्स, तसेच कर्तृत्वान कर्मचारी यांची नियुक्ती करावी असे निवेदन ता. आरोग्य अधिकार यांना देऊन संबंधीत विषयी चर्चा करण्यात आली यावेळी, ता. आरोग्य अधिकारी यांनी लवकरच मौ. चांडोळा येथे निवासी नर्स, तसेच कायमस्वरूपी डॉक्टर त्या ठिकाणी ठेवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला, तरीही, लवकरात लवकर मौ. चांडोळा येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स, कर्मचारी व सर्व सुविधा उपलब्ध नाही झाल्यास आम्हांला मासच्या वतीने हे प्रकरण हाती घेऊन अतिशय तीव्र पद्धतीने संविधानिक मार्गाने न्याय मिळे पर्यन्त लढा द्यावा लागेल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी हि सर्वस्वी या आरोग्य विभागाची राहील असा इशारा हि या ठिकाणी मासच्या वतीने देण्यात आला,यावेळी माझ्या सोबत मासचे जिल्हा सचिव अनिल कावडे, मासचे मुखेड ता. अध्यक्ष का. अ. आत्माराम गायकवाड, चांडोळचे मनोज बोयनर, चंद्रकांत कावडे आदी जण उपस्थित होते.