
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
देगलूर:देगलूर तालुक्यातील माळेगाव (मक्ता) परिसरातून देगलूर- घूळा (तेलंगणा) व नांदेड ते माळेगाव (मक्ता) अशा दोन बसफेऱ्या नियमित सुरू करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांनी देगलूरच्या आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात माळेगाव परिसरात असलेल्या शालेय विद्यार्थी, नोकरवर्ग, शेतकरी, व्यापारी व अन्य नागरिकांना देगलूर- घुळा ही चालू असलेली बससेवा बंद केल्याने वारंवार होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची मोठी फरफट होत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी वारंवार यासंदर्भात विनंती केली. मात्र वेगवेगळे कारण दाखवून उडवाउडवीची उत्तरे आगर प्रमुखांनी दिले. दुर्गम भागातील नागरिकांना दळणवळण करताना यामुळे मोठा फटका बसत आहे. दरम्यान या दोन्ही फेऱ्या तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, तात्काळ कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा माळेगावकर यांनी दिला आहे.