
दैनिक चालू वार्ता मोताळा प्रतिनिधी गणेश वाघ:-
तालुक्यातील शेलगाव बाजार येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकने निपाणा येथील खातेदार अर्चना प्रशांत किनगे यांचे बचत खाते होते. त्यामध्ये त्यांनी 330/- रुपयाचा पंतप्रधान जीवन ज्योती सुरक्षा विमा काढला होता. दरम्यान 8 ऑगष्ट रोजी त्यांचे अकाली निधन झाले. सदर बाब बँकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे जमा केले व पाठपुरावा करुन दि.२२ डिसेंबर रोजी त्यांचे वारस मयुर प्रशांत किनगे यांच्या बचत खात्यामध्ये दोन लाख रुपये जमा केले. व त्यांच्या वारसाला विम्याचा लाभ मिळविण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा शेलगाव बाजार, विभागीय कार्यालय अकोला शाखा प्रबंधक राजेंद्र कोळी, सहाय्यक प्रबंधक निखिल खरे, व बँक मित्र वासुदेव इंगळे यांनी प्रयत्न केले. सर्व खातेदारांनी पंतप्रधान सुरक्षा विमा, अटल पेंशन व जीवन ज्योती विमा काढावा असे
आवाहन शाखा प्रबंधक राजेंद्र कोळी, तसेच निपाणा गावच्या सरपंच सौ.सरलाताई संतोष तांदुळकर केले आहे.