
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
संविधानाने दिलेले अधिकार व राज्यघटनेत नमूद असलेल्या मुद्द्यांना मूठमाती देत मागील काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडत काही नेत्यांनी भाजप पक्षासोबत घरोबा करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले आहे मात्र हे सरकार फार काळ टिकणार नसून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचा सरकार येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी दि.31 डिसेंबर 2022 रोजी म्हसळा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य सत्कार कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले आहे.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकपणे बोलताना सांगितले की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मागील वर्षाभरात केलेल्या विविध लोकोपयोगी विकास कामांची माहिती देऊन म्हसळा श्रीवर्धन, दिवेआगर या परिसरात पर्यटन वाढीला चालना दिली आहे असे सांगून माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या सहकार्याने कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळ, महाड येथील पूरपरिस्थिती असे अनेक नैसर्गिक आपत्ती व संकटे यांना धैर्याने सामोरे जाऊन येथील जनतेला विश्वासात्मक दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे असे सांगितले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना मंजूर करणे अशा विविध महत्वाचे कामांना प्राधान्य देऊन गतिमान विकास करण्यावर भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव, महापुरुष, शिक्षणमहर्षी, राज्यातील महिला भगिनी, खासदार सुप्रियाताई सुळे यांचेवर विद्यमान सरकार मधील मंत्री अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरतात याबद्दल खेद व्यक्त करून राज्याचे शिंदे – फडणवीस सरकारचा समाचार घेतला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यातील जनतेने भरभरून मतदान रुपी प्रेम दिले याबद्दल सर्व जनतेचे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानून आगामी काळात होणाऱ्या तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत देखील भरभरून प्रेम देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्याचे आव्हाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील बिनविरोध व प्रत्यक्ष निवडणूकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच व सदस्य यांचा सत्कार खासदार सुनिल तटकरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सत्कार कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अलिशेठ कौचाली,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष असहल कादिरी, जिप माजी सभापती बबन मनवे,महिला तालुका अध्यक्षा सोनल घोले, जिल्हा महिला चिटणीस रेशमा कानसे,माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदीप चाचले, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, शाहिद उकये, शहर अध्यक्ष रियाझ घराडे, लहूशेट म्हात्रे,अनिल बसवत,नाना सावंत, सतिश शिगवण, किरण पालांडे, महेश घोले,प्रकाश गाणेकर यांसह नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.