
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
आज प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.01-01-2023 रोज रविवार श्री साईबाबा मंदिर संस्थान, देगलूर येथून पालखी व रथाचे प्रस्थान झाले. ही पदयात्रा दि. 01-01-2023 रोज रविवार देगलूर येथून निघुन दि. 14-01-2023 रोजी शिर्डी येथे पोहचेल या या पतयात्रेसाठी सर्व देगलूर व देगलूर परिसरातील हजारो साई भक्तांनी या पदयात्रेमध्ये सहभाग होऊन साईबाबा चा जल्लोसात देगलूर येथून ठीक चार वाजता देगलूर येथून प्रस्थान झाली
या पद्यातील साई भक्तांना दुपारी 1.30 वाजता वरदानंद दाल मिल येथे महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते
साई भक्तांना महाप्रसादाचा आयोजन देगलूर येथील प्रसिद्ध व्यापारी
संतोष नारलावार,कैलास पोलावार,सुभाष पांचाळ,रुपेश काशेटवार,दिगंबर कौरवार यांनी आयोजन केलं होतं व जे साईभक्त
पदयात्रेत सहभागी होऊ इच्छीनाऱ्या भक्तांचे फराळ, चहा, भोजन आंघोळीची व राहण्याची व्यवस्था जागो जागी करण्यात येत आहे.
पदयात्रा देगलूर-खानापूर- एकलारा मुखेड-सावरगाव (पि.) शिरुरताजबंद- अहमदपूर- किनगाव-धर्मापूरी-घाटनांदूर- परळी वैद्यनाथ- शिरसाळा-दिंद्रुड-माजलगाव-शेवगाव-
नेवासा फाटा – श्रीरामपूर मार्गे श्रीक्षेत्र शिर्डी असा प्रवास राहील. 14 जानेवारी 2023 रोजी ही पदयात्रा शिर्डी येथे
पोहोचणार असे साई भक्त समिती देगलूर यांनी माहिती दिली.