
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार —- जि.प.प्रा.शा.मरशिवणी संकुल दिग्रस बु.येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक एस .आर केंद्रे जिल्हा सल्लागार महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जि.शा.नांदेड यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सहपत्निक शाल, श्रीफळ पुष्पहारांनी सत्कार महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ता.शा.कंधारच्यावतीने नुकताच करण्यात आला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, राज्य संघटक अशोक मोरे ,जिल्हाप्रमुख प्रमुख सल्लागार बी.टी केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मुंडे, कंधार तालुकाध्यक्ष मोबीन शेख,तालुका उपाध्यक्ष डी.एन मंगनाळे, तालुका संघटक शंकर तेलंग , जिल्हा उपाध्यक्ष नामदेव कल्याणकस्तुरे आदी उपस्थित होते.