
दैनिक चालू वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी- विश्वास खांडेकर
संस्कृत भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा म्हणून ओळखली जाते .भारतीय भाषांची ती मातृभाषा देखील आहे. जगातील सर्व वैज्ञानिक ज्या भाषेला विज्ञान निष्ठ भाषा म्हणून पाहतात त्याच भाषेला नांदेड जिल्ह्यामध्ये काही अज्ञानी शिक्षक अयोग्य भाषा आहे असे म्हणून आपप्रचार करताना दिसत आहेत.
संपूर्ण माहिती अशी की संस्कृत भाषेची निर्मिती कधी झाली हे पूर्णपणे सांगता येणार नाही, परंतु जवळपास दहा हजार वर्षापासून या भाषेचा प्रचार, प्रसार आणि विकास होत आलेला आहे. एवढेच नाही तर संस्कृत भाषेतील अनेक पुस्तके आज देखील आदर्श आहेत. या भाषेचे महत्त्व सांगावे तेवढे कमी आहे आणि याचा स्वीकार नुसता भारतातच नाही तर देश विदेशात देखील केला गेला आहे. ही एक राजमान्यता भाषा आहे. तरी देखील फक्त आपल्या पोटाची खळगी भरावी यासाठी काही तुटपुंज्या लोकांकडून या भाषेच्या अपप्रचार चालू केलेला आहे. त्याबद्दल संस्कृत साहित्य मंडळ किंवा संस्कृत प्रेमी लोक विरोध करण्याच्या तयारीत आहेत.
नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने संस्कृत भाषा ही आठवी ते बारावी पर्यंत शिकवली जाते. आठवी ते दहावी व अकरावी बारावीला हा ऐच्छिक विषय म्हणून ठेवलेला आहे. तरी देखील ज्या शाळेत हा विषय आहे त्या शाळेतील विद्यार्थी जास्तीत जास्त संस्कृत भाषेलाच निवडतात. यामुळे बौद्धिक ,माणसीक, सांस्कृतिक, उच्चारण दृष्टीने विद्यार्थ्यांचा विकास होतो. परंतु काही काही वेळेस आपल्या विषयाचे महत्त्व पटवून देत असताना काही लोक या संस्कृत भाषेचा अपप्रचार करण्याच्या नादात लागले आहेत. खास करून इथे चालणारे कोचिंग क्लासेस आणि ती देखील इंग्रजी माध्यमांची कोचिंग क्लासेस.ते तर फारच या संस्कृत भाषेच्या विरोधात दिसून येत आहेत. जर असेच वातावरण राहिले तर या क्लासेसची स्वतः जाऊन कान उघाडणी करावी लागेल. ज्या भौतिकशास्त्राला, रसायनशास्त्राला, जीवशास्त्राला आजच्या क्लासेसने अतिशय महत्त्व दिलेले आहे ती शास्त्र समजून घेण्यासाठी सुद्धा भाषेची आवश्यकता असते ,हे मूळ विसरून गेलेले आहेतकाय? जरी अंग्ल भाषेमध्ये आज सर्व पुस्तक आढळत असले तरी या शास्त्रांचे मूळ संस्कृत भाषेत आहे हे येथील क्लास वाले विसरून गेले आहेत की काय असे वाटत आहे? इकडे तर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाच्या अनेक गप्पा पालकांसोबत मांडणारे हे क्लास वाले जी भाषा भारतीय संस्कृतीचा विकास करून देते तिच्या विरोधात एवढे का विरोधक हे अनाकलनीय आहे.
अनेक विद्यार्थ्यांना आता हे लोक हे पटवून देण्याच्या नादात आहेत की संस्कृत भाषा पुढे कुठेही उपयोगी नाही. पण या अज्ञानी आणि अल्पबुद्धी शिक्षकांना कोण सांगणार की सर्व शास्त्रांचे ज्ञान मूळ संस्कृत मध्येच आहे. तुम्ही ज्या वैदिक शास्त्राच्या गप्पा मारत आहात ते वैदिक शास्त्र आज देखील संस्कृत भाषेत शिकवले जाते ,हे विसरला आहात का? किंवा या वैदिक शास्त्राचे मूळ संस्कृत आहे हे तुम्हाला समजून सांगण्याची वेळ येऊ देता का ?आता हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे मूळ भाषा सोडून फक्त पैशाच्या मागे लागणाऱ्या ह्या क्लासेसने आता तरी मराठी, संस्कृत ,हिंदी अशा भारतीय भाषांना महत्त्व दिले पाहिजे. आम्ही म्हणत नाही की दुसऱ्या भाषेचा अनादर करा परंतु भारतीय भाषांना सोडून फक्त आग्ल भाषा शिकण्याचा अट्टाहास का ?आणि ज्या भाषेत तुम्ही शिकत आहात त्या भाषेचा पूर्णत्वाकडे नेण्याचा दृष्टिकोन सुद्धा दिसत नाही . ज्या भाषा परिपूर्ण स्वयंभू आहेत अशा भाषांना जगाने मान्यता दिली आहे तरी देखील पैशाच्या स्वार्थांपायी त्यांचा विरोध का? संस्कृत साहित्य मंडळ, संस्कृत प्रेमी या सर्वांनी याकडे लक्ष दिले पाहिजे .एकत्र येऊन संस्कृत प्रचार प्रसार आणि विकास यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर आपले मूळ कार्य सोडून या तथाकथित काही इंग्रजी माध्यमांच्या ट्युशन वाल्यांनी संस्कृत भाषेचा असाच अपप्रचार चालू ठेवल्यास त्यांच्याविरुद्ध वारंवार आवाज उठवण्याचे कार्य आम्ही नेहमीच करू .जोपर्यंत संस्कृत भाषेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचे कार्य चालूच राहील.