
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शैक्षणिक महासंघाच्या उपाध्यक्ष पदी संजिवनी महाविद्यालय , चापोलीचे लोकप्रशासन विभाग प्रमुख व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संतराम मुंढे यांची पुन्हा एकदा फेर निवड झालेली आहे . त्यांच्या निवडीमुळे विद्यापीठ परिक्षेत्रात योग्य व्यक्तिला त्यांच्या कामाची पावती मिळाल्याचे बोलले जात आहे . मागील अनेक वर्षांपासून संघटनेच्या मोर्चे बांधणीसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतलेला आहे . प्राध्यापक व शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात . विशेष म्हणजे या विद्यापीठाच्या परिसरातील एकमेव व्यक्तीला ही संधी मिळाली आहे .
त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाच्या नांदेड जिल्ह्यातील कार्यकारिणीचे प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार , जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप भडके , उपाध्यक्ष डॉ. बळीराम लाड , सचिव डॉ. संजीव रेड्डी , सहसचिव डॉ. संदीप लाडकर , जिल्हा संघटनमंत्री डॉ. चंद्रकांत एकलारे , सहसंघटनमंत्री डॉ. संतोष येरावार , कोषाध्यक्ष डॉ. प्रदीप सिसोदिया , प्रसिद्धी प्रमुख डॉ. मनिष देशपांडे , महिला प्रतिनिधी डॉ. विभाती कुलकर्णी , डॉ. लाखे , निमंत्रित सदस्य डॉ.अरुणा शुक्ला , डॉ. बालाजी चिरडे , डॉ. उमेश पुजारी , डॉ. पंडीत मोरे व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले आहेत .