
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज (ता. २ जानेवारी) चंद्रपूरमध्ये सभा झाली.
मात्र, या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. त्यांच्या या अनुपस्थितीची चर्चा चंद्रपूरसह विदर्भात रंगली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात फडणवीस सभेला न येण्याचे कारण सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते चंद्रपूरमधील नड्डा यांच्या सभेला अनुपस्थित होते, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती रविवारी रात्री एकच्या सुमारास अचानक बिघडली. त्यांची प्रकृती सभेला येण्यालायक नाही, त्यामुळे ते पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांच्या सभेला येऊ शकले नाहीत.
चंद्रपूरमधील सभेला फडणवीस यांची शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांनी चंद्रपूरमधील सभेला येण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांचे तापमान हे १०३ डिग्रीपर्यंत गेलं, त्यामुळे ते नड्डा यांच्या सभेला येऊ शकले नाहीत. त्यांनी तशी विनंती करून क्षमाही मागितली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.