
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी : -शिवकुमार बिरादार
मुखेड – महाराष्ट्र ही संतांची, राजे महाराजे, महापुरुषांच्या पावन स्मृतीने, त्यागाने व बलिदानाने निर्माण झालेली सुसंस्कृत विचाराचा वारसा लाभलेली महान भूमी आहे. या पावन भूमीमध्ये सध्या सर्वत्र राजे महाराजे, संतांच्या, महापुरुषांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करून इतिहासाची मोड तोड करून आपल्या हिशोबाने इतिहासाला लाजवेल असे वाचाळ वक्तव्य करून संत नामदेव महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल चुकीचे व अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ व सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून या गंभीर प्रकारामुळे देशांमध्ये सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे. ही बाब थांबवण्यासाठी आपण वाचाळ वक्तव्य करणाऱ्या वर तात्काळ कार्यवाही करून गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा वाचाळ वीरांना
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये फिरकू देणार नाही याची आपण तात्काळ दखल घ्यावी व यापुढे जर महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान झाल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपल्या सरकारची असेल याची दक्षता घ्यावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवश्री गिरीधर पा शिंदे केरुरकर (अखिल भारतीय छावा संघटना युवा तालुकाध्यक्ष मुखेड), सतीश पाटील शिंदे,बालाजी पाटील शिंदे, माधव शिरूळे, अरविंद पाटील हिवराळे, आनंद पाटील शिंदे, रविकांत वाघमारे आदी उपस्थित होते.