
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड – मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.
पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने लग्नाच्या आधी त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. जोतीराव फुले पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी घरातच सावित्रीबाईनां शिकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्त्रीने शिक्षण मिळवणे हा एक प्रकारचा पाप मानला जात असे. परिणामी ज्योतिरावांचा विरोध सुरू झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि सावित्रीबाईनां शिक्षण देण्यास सुरू ठेवले. अशाच प्रकारचे अनेक विचार सावित्रीबाई फुले विषयी विद्यार्थिनी यांनी मांडल्या.
आठव्या वर्गातील मुलींनी शाळा अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले.यावेळी मुख्याध्यापक श्री शिवाजी जाधव सर, सांस्कृतिक प्रमुख संगमे मॅडम, चालीकवार मॅडम,काटशेव सर, सुनील हिवराळे सर, रुदेवाड सर, विजय आमटे सर, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.