
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दावणे..
मंठा जमिनीचा ताबा न दिल्याने आणि प्रशासनानेही मागणी दुर्लक्षित केल्याने संतापून स्वतः ला जमिनीत गाडून घेण्याचे लक्षवेधी आंदोलन केल्याची घटना तालुक्यातील हेलस येथे घडली
, सविस्तर असे की 2019 मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळी करण योजने अंतर्गत कौशल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते त्यांना 1 हेक्टर 35 आर एव्हढी जमीन मिळाली होती पण त्यांना जमिनीचा ताबा मिळाला नाही प्रशासन व शासन दरबारी अनेक चकरा मारून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या सुनील पांडुरंग जाधव यांनी कौशल्याबाई जाधव आणि नंदाबाई सदावर्ते यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःला जमिनीत गळ्या पर्यंत गाडून झोपलेल्या न्याय व्यवस्थेला जाग आणून दिली..सलग 24 तास हे आगळे वेगळे आंदोलन केले अखेर जालना समाजकल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी युद्धस्तरावर कार्यवाही करून साक्षिदार गजानन खराबे, अब्दुल रहीम इस्माईल कुरेशी, रमेश प्रधान, सुनील जाधव, नामदेव बनसोडे, विकास खराबे यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कौशल्याबाई जाधव आणि नंदाबाई सदावर्ते यांना जमिनीचा ताबा पत्र आंदोलकास सरपंच बनसोडे, पंच व नागरिकासमोर स्वाधीन केले. याप्रसंगी मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, शासकीय निवासी शाखाप्रबंधक दत्तात्रय वाघ, एस डी दिघे, यांनी विशेष परिश्रम घेऊन प्रकरण हाताळण्यात सहकार्य केले. डी. एन सानप, तलाठी टी. एस माळी, एस जी जोगदंड, ए एस खान, पो उप नि राऊत, पो उप नि शिंदे, आढे, मेखले, राजाळे आदी उपस्थित होते..