
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..खाजगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवार दि 3 च्या मध्यरात्रीपासून संघर्ष कृती समितीने पुकारलेल्या तीन दिवसीय लाक्षणिक संपात मंठा येथील सर्व कामगार कर्मचारी सामील झाले असल्याने तालुक्यातील प्रकाश व्यवस्था बँक व्यवहार ,हॉस्पिटल्स यंत्रे ,व्यावसायिक व इतर सर्व विजेशी संबंधित कामे ठप्प झाली आहेत या बाबत प्रतिनिधीने वितरण कं च्या कृती समितीच्या पदाधिकाऱयांना विचारले असता विजेचे करण्यात येणारे खाजगीकरण करू नये तसेच बाह्य कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणे या प्रमुख मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा संप पुकारण्यात आला असून मंठा सह नव्वद 90 % कामगार यात सहभागी झाले असल्याची माहिती सांगितली तसेच आमचा हा संप यशस्वी होईलच असा आत्मविश्वास संघर्ष कृति समिती ,मंठा शाखा प्रमुख दिनेश गादेवाड यांनी व्यक्त केला