
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका आवाळपूर
3 जानेवारी 2023 रोज मंगळवारला आवाळपूर येथे रमाई महिला मंडळ व आम्रपाली महिला मंडळ तसेच गावातील सर्व महिलाच्या सहकार्याने आयोजित क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती सांस्कृतीक भवन आवाळपूर येथे मोठया आनंदात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच सौ, प्रियंका दिवे, प्रमुख पाहुणे म्हणून तारा डाहुले, अल्का दिवे, शोभा कवाडे, दीपा डाखरे, वर्षा गोहोकार, गीता अवताडे, प्रभा कवाडे, गीता मासिरकर, सुनीता नगराळे. नंदा सूर, सुश्मिता पाणघाटे, स्वाती नगराळे, मनीषा कोटे, ऐकता वानखेडे, शारदा मोहुर्ले.ज़िल्हा परिषद शाळेतील शिक्षिका येरणे मॅडम व पोतले मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमात उद्योग निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल पूनम प्रभाकर कुसराम व 2021 मध्ये 71 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथ रॅली दिल्ली येथे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी करणाऱ्या आवाळपूर येथील कु. नाजूका प्रभाकर कुसराम यांचा आवाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुली व महिलाकरिता सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. महिलाची संगीत खुर्ची घेण्यात आली. महिलांनी सावित्रीबाई च्या गीतावर विविध नूत्य सादर केले. प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक मंदा डभारे यांनी केले तर सूत्रसंचालन शिला ओलोणे व आभार प्रदर्शन आशा किन्नके यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.