
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
भारतातील विविध क्षेत्रात आपला कामाचा ठसा उमटवणाऱ्या ५० युवकांना भारतीय प्रवासी दिन सोहळ्याचे भारत सरकार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या कडून विशेष निमंत्रण देण्यात आले असून महाराष्ट्रतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते मनोज विष्णु गुंजाळ यांचा त्यामध्ये समावेश आहे.
भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदा होणारा १८ वा भारतीय प्रवासी दिवस हा ८ ते १० जानेवारी दरम्यान इंदौर, मध्यप्रदेश येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ,गुयाना देशाचे राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्यप्रदेशचे मुखयमंत्री शिवराजसिंह चौहान, देशाचे परराष्ट्र मंत्री, केंद्रीय युवा मंत्री यांसह अनेक केंद्रीय मंत्री व अनेक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व ५० हुन अधिक देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.