
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दि. 3 जानेवारी या दिवशी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्ताने विद्यालयात स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 45 विद्यार्थी शिक्षक म्हणून सहभाग नोंदवला.हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आले.पहिल्या सत्रात स्वयंशासन दिनाच्या तासिका घेण्यात आल्या.दुसर्या सत्रात सहभागी शिक्षकांचे मनोगत आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा आजचे मुख्याध्यापक कु.देवकत्ते वैष्णवी,प्रमुख उपस्थितीत उपमुख्याध्यापक चि. अद्वेत पाटील, देगावकर दमन, सौ.तोटावार सुरेखा (अभ्यास पुरक मंडळ प्रमुख) मंचावर उपस्थित होते . सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यानंतर विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका यांनी कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा त्यांच्या भाषणातून सांगीतले.यानंतर सहभागी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक देगावकर यांनी स्वयंशासन दिनात सहभागी शिक्षकांचे कौतुक केले.आभार कु.आदिती पाटील, प्रास्ताविक कु.स्नेहाली माथुरे ने सादर केले. पद्य चि.निलावार न गायले.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन चि.वरद रेखावार ने केले.या कार्यक्रमास वर्गशिक्षिका सौ.कुलकर्णी स्मिता यांचे विशेष सहकार्य लाभले.