
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
आजच्या धकाधकीच्या गतिमान युगात प्रत्येकाची कार्य करण्याची गती वाढलेली आहे.प्रत्येकजण आपले काम गतीने व्हावे यासाठी वाहनाने प्रवास करत आहे. नवीन वाहने सुद्धा ही अधिक गतिमान आलेली आहे. त्या मुळे रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत.अपघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली वाहने चालवताना आपल्या सोबत इतरांची काळजी घेऊन वाहण चालवले पाहिजे असे प्रतिपादन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनील निमसे यांनी केले.
ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने आयोजित विशेष शिबिरात , रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजन रोडगी ता.अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर सुनील निमसे( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी,नांदेड), हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच स्वप्निल राजूरकर (आरटीओ इन्स्पेक्टर), अमोल आव्हाड ( आरटीओ इन्स्पेक्टर,नांदेड) प्रा. एस. जी. बिराजदार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी ,डॉ. रघुनाथ शेटे , कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम राठोड मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा रोडगी हे होते.
याप्रसंगी प्रास्ताविक आरटीओ इन्स्पेक्टर स्वप्निल राजूरकर यांनी केले. ते प्रास्ताविक पर मनोगतात म्हणाले की, आज वाहनांची संख्या वाढलेली आहे रस्ते मोठे झालेले आहेत. मोठ्या रस्त्यांवर वाहन गतीने चालवले जात आहेत. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले वाहन नियमानुसार चालवले पाहिजे. पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त लोकांच्या मध्ये वाहन नियमानुसार चालवणे, रस्ता अपघात व रस्त्यावरून चालणे याबाबत जनजागृती जनजागृती करण्यात येत आहे. असे ते म्हणाले.
मार्गदशक पर मनोगत व्यक्त करताना आरटीओ इन्स्पेक्टर अमोल आव्हाड आपल्या मनोगत म्हणाले प्रत्येक युवकांनी आपले वाहन बिना परवाना चालवू नये. तो गुन्हा आहे, वाहन चालवण्याचे अगोदर आरटीओ किंवा ड्रायव्हिंग स्कूल कडून यथायोग्य प्रशिक्षण घेऊनच वाहन चालवावे असे ते म्हणाले.
पुढे सुनील निमसे बोलताना म्हणाले व्यक्तींनी रस्त्याने पायी चालताना उजव्या बाजूने पायी चाललं पाहिजे.हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. वाहन हे डाव्या बाजूने चालावीत आणि पादचाऱ्यांनी उजव्या बाजूने चाललं पाहिजे. जेणेकरून समोर येणारे वाहन आपल्याला स्पष्ट दिसेल आणि पाठीमागच्या बाजूने वाहन येऊन एक्सीडेंट होणार नाहीत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी, युवकांनी आपल्या घरच्यांपासून याची सुरुवात करून समाजामध्ये याबाबत जागृती केले पाहिजे. असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनेचा युवक हा सामाजिक कार्यात अग्रेसर असतो,त्या मुळे प्रत्येकाने आपल्या राष्ट्रीय कार्यात योगदान दिले पाहिजे असे ते त्यांनी याप्रसंगी आव्हान केले. या कार्यक्रमाचे संचलन अमोल सरोदे यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. एस.जी. बिराजदार यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका व गावातील लोक उपस्थित होते.