
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिक,जेष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारीतेतील कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य सल्लागारपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ललित लेखक, समीक्षक तथा लोह्याचे ज्येष्ठ पत्रकार, व महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. आजही सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक , राजकीय, वाङ्मयीन व सामाजिक हिताच्या दृष्टीने लेखन करून विविध प्रश्नांना वाचा फोडतात.
पत्रकारितेच्या माध्यमातून सतत २५ वर्षे सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. त्यांना शैक्षणिक, वाङ्मयीन, पत्रकारिता यासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्द लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना नुकतीच अमेरिकेतील नामांकित सेंट्रल विद्यापीठाने’ डी. लिट्.’ ही मानाची पदवी देऊन गौरव केला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य सल्लागारपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे घोषित केले.
निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य व विभागीय सर्व पदाधिकारी तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.