
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील प्रसिद्धी विभागाकडून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय व मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला होता . या प्रसंगी मुखेड शहर व परिसरातील पत्रकारांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान सोहळा साजरा करण्यात आला आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे , प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.साहेबराव बळवंते , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , व्यासपीठावर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील ( लोकमत ) , सचिव विजय बनसोडे ( दै.बाळकडू , श्रमिक एकजूट , दलितवाणी ) , उपाध्यक्ष रामदास पाटील ( दै.केसरी ) , सहसचिव संजय कांबळे ( दै.तरुण भारत ) , कोषाध्यक्ष भास्कर पवार ( उद्याचा मराठवाडा ) , जेष्ठ पत्रकार संदीप कामशेट्टे ( दै.पुण्य नगरी ) , सुशील पत्की ( दै.सामना ) , शिवकांत मठपती ( दै.सत्यप्रभा ) , मेहताब शेख ( दै.गाववाला ) , अँड.अशीष कुलकर्णी ( दै.प्रजावाणी ) , जैनोद्दीन पटेल , अनिल कांबळे ( दै.देशोन्नती ) , भारत सोनकांबळे ( संपादक , स्वाभिमान भारत न्यूज पोर्टल ) , शेख जावेद अहमद ( आत्ताचा एक्सप्रेस ) , प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे ( दै.यशवंत ) , प्रा.अनिल गोडणारे ( सीमावर्ती वार्ता ) इत्यादी विविध वृत्तपत्रातील पत्रकार यांची उपस्थिती होती .
उपस्थित सर्व पत्रकार मान्यवरांना यथोचित लेखनी , गुलाब पुष्ष देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे यांनी केले . भाषणात अँड.अशीष कुलकर्णी यांनी दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता , वाढत चाललेली सामाजिक भीषणता आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन व कार्याच्या विषयावर प्रकाश टाकला . माजी पत्रकार संघाचे सचिव शेख मेहताब यांनी पत्रकारांच्या करण्यात आलेल्या सत्काराबद्दल प्राचार्य व प्रसिद्धी विभागाचे कौतुक करत आभार मानले . समाजातील प्रत्येक क्षेत्रातील जाणीव करून दिली . पत्रकारांचे लेखन सामर्थ्य आणि समाजातील वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले .
पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उल्लेख करताना महाविद्यालयाच्या उज्वल यशाच्या परम्परेत पत्रकारांची भूमिका , दायित्व आणि येणाऱ्या काळात महाविद्यालयाकडून दैदिप्यमान कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली . समाजाला योग्य दिशा देणाऱ्या ज्ञानमंदीराचा सारथी चांगला असला तर समाज आपोआप चांगला घडत असतो असे विचार प्राचार्यां विषयी व्यक्त केले . अध्यक्षीय समारोपाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांनी पत्रकारांचे स्वागत व आभार मानले . महाविद्यालयाच्या विकासात खरे दर्पण आपण सर्व पत्रकार आहेत . समाजात बदल घडवून आणण्याची संपूर्ण क्षमता पत्रकारांमध्ये असते . पत्रकारांची कुशलता आणि योगदान हे देश घडवित असते . पत्रकारांच्या कार्याची दखल घेत आमच्या शैक्षणिक संस्थेचे दायित्व समजून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे विचार मांडले . याप्रसंगी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .