दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कृषी प्रदर्शन शेतकरी महामेळावा सिल्लोड येथे पार पडला त्या कृषी महामेळाव्याला महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आणि तन्नधान्य पौष्टिक आहार 2023 निमित्त नांदेड जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व स्मार्ट प्रकल्प अधिकारी श्री अरुण घुमनवाड साहेब यांनी लोहा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील सायाळकर यांना त्यांच्या शेतातील राजगिरा, बाजरी ,बादली ज्वारी इत्यादी पिके प्रदर्शनात आणण्यासाठी सांगितले व ते सर्व पिके प्रदर्शनात रत्नाकर पाटील यांनी आणले त्या क्षणी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी गावरानी व्हरायटी नोंद घेतली महाराष्ट्रातील प्रदर्शनाला आलेल्या शेतकऱ्यांनी राजगिरा बियाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली 400 च्या वर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये राजगिरा पेरायचे ठरवले आहे आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे नेण्याची तयारी दाखवली आहे लोहा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी रत्नाकर पाटील यांच्याकडे राजगिऱ्याच्या दोन प्रजाती आहेत एक आहे चॉकलेटी कलरचा राजगिरा आणि दुसरा आहे पांढऱ्या कलरचा राजगिरा त्यापैकी चॉकलेटी राजगिऱ्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे राजगिऱ्याला कोकणातील शेतकऱ्यांनी जास्तीची मागणी केल्याचे दिसून आले यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे उपस्थित होते स्मार्ट प्रकल्प अधिकारी श्री अरुण घुमनवाड साहेब उपस्थित होते लोहा तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपीलवार, सायाळ चे मा सरपंच संभाजी पाटील ढगे सायाळचे प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील ,आडगाव चे प्रगतशील शेतकरी राम पाटील क्षीरसागर, पारडि चे युवा उद्योजक शेतकरी शंकर डिकळे ,दापशेडचे शेतकरी विश्वनाथ होळगे प्रगतीशिल शेतकरी दत्ता क्षीरसागर, दगड गावचे प्रगतशील शेतकरी मोहन मुदगुले ,तालुक्यातील आदी शेतकरी उपस्थित होते


