दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- परीक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या 2022 /23 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिकणारी इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी गार्गी चंद्रशेखर नळेगावकर राहणार अहमदपूर ही या परीक्षेत राज्यात दहावी व जिल्ह्यात पहिली आली आहे. 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये लागलेला असून त्यामध्ये ह्या विद्यार्थिनीने यश प्राप्त केलेले आहे.
या यशाबद्दल गार्गी चंद्रशेखर नळेगावकर यांचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि गार्गी चे आई वडील आजोबा श्री हेमंत देविदास कुलकर्णी , मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष श्री अशोक चापटे, अनिस चे राज्य समन्वयक श्री हरिदास तमेवार, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब वाघमारे, बौदधी सत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे, शिक्षक संघटनेचे श्री मधुकरराव जोंधळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि माजी पीएसआय श्री धर्मपाल गायकवाड, पुरोगामी प्रबोधनकार ह भ प संजय महाराज नागपूरने यांनी गार्गी कुलकर्णी हिचे अभिनंदन केले


