दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी पुरीगोसावी
ता. कोरेगांव तालुक्यांच्या करंजखोप नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे… तपोनिदी संतपुरी गोसावी महाराज यांच्या समाधी संजीवन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहांत संपन्न. या कार्यक्रमानिमिंत्त समस्त पुरीगोसावी परिवाराकडूंन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परमपूज्य योगेश महाराज गिरी (गुरसाळेकर) यांच्या हस्ते महा अभिषेक व आरती पुष्पांजली तसेच विधिवत पूजा व महाप्रसाद तसेच चवणेश्वर वारकरी संप्रदायिक भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे या संजीवन सोहळ्यानिमिंत्त करण्यांत आले होते. या संतपुरी गोसावी महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमिंत्त मान्यवर मंडळी तसेच करंजखोप ग्रामस्थ व पै.पाहुवणे मंडळी आणि सातारा जिल्ह्यांतील सर्व गोसावी बांधव या सर्व मान्यवरांच्या व करंजखोप नगरीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संतपुरी गोसावी महाराज समाधी संजीवन सोहळा मोठ्या उत्साहांत संपन्न झाला. संतपुरी गोसावी महाराज यांचे कार्य खूपच महान होते. पूर्वी काळी इतिहासांमध्ये संन्यासी संतपुरी गोसावी महाराज यांनी जिवंत करंजखोप नगरीत समाधी घेतली होती. त्यामुळे या पंचकोशीसह परिसरांमध्ये जिवंत समाधी म्हणून संत पुरीगोसावी महाराज यांचे अजूनही नाव अजरामर आहे. पुरीगोसावी परिवाराकडूंन दरवर्षी करंजखोप नगरीमध्ये मोठ्या उत्साहात अभिषेक पुष्पांजली संजीवन सोहळा उत्साहात संपन्न केला जातो. यावेळी समस्त पुरीगोसावी परिवाराकडूंन महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमिंत्त विनंतीला मान देवुन येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पुरीगोसावी परिवाराकडूंन स्वागत करण्यांत आले. कार्यक्रमाप्रसंगी दत्तात्रेय पुरीगोसावी रामचंद्र पुरीगोसावी,उत्तम पुरीगोसावी (दादासाहेब)भरत गिरीगोसावी (जावई ) यश गिरी (भाचा) निवास पुरीगोसावी, प्रकाश पुरीगोसावी,आकाश पुरीगोसावी योगेश पुरीगोसावी ,महेश पुरीगोसावी, सार्थक पुरीगोसावी,संतोष पुरीगोसावी, रवी पुरीगोसावी तसेच पुरीगोसावी कुटुंबातील महिलावर्ग तसेच कुटुंबातील सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.


