दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषद मुख्यालय अमरावती यांच्या वतीने अधिकारी,कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम निमित्याने माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती येथील मैदानावर क्रिकेट सामने घेण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करतांना जो शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होतो.त्याकरिता कर्मचारी यांना खेळाबद्दल महत्व पटवून दिले.तर उद्घाटनीय क्रिकेट सामन्यामधे सामान्य प्रशासन विभाग विरुद्ध शिक्षण विभाग यांचा क्रिकेट सामना चुरशीचा पाहायला मिळाला.त्यानंतर वित्त विभाग विरुद्ध ग्रामीण पुनर्वसन विभाग त्याचप्रमाणे आरोग्य,महीला बाल कल्याण,शिक्षण,पशु संवर्धन,बांधकाम,सिंचन इत्यादी विभागांमध्ये प्रेक्षणीय सामने पाहायला मिळाले.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दोन झेल टिपल्या तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका सामन्यात चार बळी घेतले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती गिरीश धायगुडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कासोदे पशुसंवर्धन विकास अधिकारी पुरुषोत्तम सोळंके,कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड,गटविकास अधिकारी सुधाकर दवंडे,गटविकास अधिकारी विनोद खेडकर,राजेश रोंघे,साविप्र विभाग पंकज गुल्हाने,किशोर वानखडे,चंद्रशेखर टेकाडे,हेमंतकुमार यावले,निशांत तायडे,श्रीकांत सदाफळे,मंगेश मानकर,विजय दिवाण,राहुल रायबोले,प्रवीण मोगरे,प्रीतम चव्हाण,मनोज सोनगडे,लाभेष राऊत,रोशन गोरडे,लीलाधर नांदे,रोशन देशमुख,गणेश तांबडे,आदित्य तायडे,संदीप बिलबिले,प्रकाश गौरखेडे,स्वप्निल बनसोड,भगत,सुदर्शन भोसले,शरद चहाकार,परमेश्वर राठोड,दिनेश राऊत,विजय उपरीकर,सद्गुण पवार,नितीन माहोरे,दुबळे आदी विभागांचे अधिकारी वर्ग यांनी क्रिकेट सामन्यांमध्ये आपला सहभाग नोंदवून खेळाचा आनंद लुटला.


