दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
मागील कांहीं दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून यावर्षी रक्त गोठविणारी थंडी कमलीची वाढल्याने रस्त्यालगत उघड्यावर झोपणाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून आल्याने जिजाऊंच्या लेकीनी पुढाकार घेत लोहा शहरातील बसस्थानक, शिवाजी महाराज चौक, शनी मंदिर परिसर, तहसील परिसर, बालाजी मंदिर परिसर आदी जवळपास सर्वच भागात फिरून बेघर रस्त्यालगत झोपलेल्या ना मायेची ऊब अर्थात उबदार ब्लँकेट पांघरून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. त्यांना लोह्यातील वृक्षमीत्र परिवाराने मोलाची साथ दिली. यावेळी इनर्व्हिल क्लबच्या शोभाताई बगडे, डॉ. सविता घंटे, डॉ. राजर्षी भोसीकर, पुष्पाताई काचावर, मंजुषा पोसपूटवर, देबडवार, छायाताई बैस, गायत्री आंबेकर, वृक्षामित्र परिवाराचे राजीव तिडके, रामराव संगेवार, मंगल सोनकांबळे, माजी नगरसेवक वसंत मुंडे, परिहार, दशरथ एंगडे, धनंजय गुंडाळे, धोंडीबा पवार, वीरभद्र स्वामी, आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जिजाऊंच्या लेकिंचे आणि वृक्षमीत्र परिवाराच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


