दैनिक चालु वार्ता परतूर आष्टी,मंठा तळणी/…
जिल्हाधिकारी जालना यांच्या कार्यालय मार्फत नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांना दिनांक.११ जानेवारी २०२३ रोजी निवेदन पाठवले निवेदनात पुढे सोळंके यांनी म्हटले आहे की शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील उत्कृष्ट दर्जाच्या कामावरती आपले लक्ष वेधू इच्छितो की ही तक्रार करीत असताना राजकीय आकाश किंबहुना काही हेतू मनात धरून ही तक्रार नाही सत्य परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचावी आपण या मार्गाची पाहणी करावी खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करून गाडीमध्ये बसून चहा पिऊन दाखवा मग आपल्या लक्षात येईल की हा रस्ता पूर्णपणे बोगस झालेला आहे, कारण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ खामगाव ते पंढरपूर या रस्त्याचे बांधकाम मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या रस्त्या संबंधित इतर कंपनीने पूर्णपणे बोगस बांधकाम केल्यामुळे मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून बेडच्या कामापासून सिमेंट बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे, उत्तम उदाहरण म्हणजे बांधकाम चालू असताना अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्याच्या शहरातून ९० किलोमीटर मंठा तालुक्यातील सरहद्द वडगाव ते परतुर तालुक्यातील गंगा सावंगी हा रस्ता जातो म्हणून MSRDC यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार केल्यानंतर सुद्धा काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा झाली नव्हती, बेडचे काम करत असताना कंपनीच्या व कंपनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकांनी आपसात संगणमत करून रस्त्याचे काम केले कारण खोदकाम करताना त्या ठिकाणी कोणतीही लेव्हल घेतलेली नाही, ज्या ठिकाणी काळी ची जमीन आहे त्या ठिकाणी काळीच्या जमिनीमध्ये इस्टिमेट प्रमाणे खोदकाम न करता या रस्त्याचे जुने मटेरियल वापरून त्या रस्त्यात दाबून टाकले म्हणून अनेक ठिकाणी रस्ता खालीवर झाला, खामगाव ते पंढरपूर या रस्त्याची पाहणी केली असता अनेक जाग्यावर रस्त्याला तडे गेले मोठमोठ्या भेगा पडल्या खड्डे पडले या सिमेंट रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे जड मालवाहतूक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरचे मोठे नुकसान होत आहे रस्ता करीत असताना रस्त्यावरती माती मिश्रित वाळू बोगस कंपनीचे सिमेंट इस्टिमेट प्रमाणे साहित्य न वापरल्यामुळे या रस्त्यावरच्या वरच्या भागातील सिमेंटचा थर निघून जात आहे त्याचा दुष्परिणाम म्हणजे या रस्त्यावर धुळीचे प्रमाण खूप आहे या सिमेंटच्या ट्रस्टमुळे मानवी जीवनावर या रस्त्यावर वस्त्या आहेत किंवा रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांच्या श्वासनावर या धुळीचा परिणाम होत आहे मा.नितीनजी आपण उद्घाटन प्रसंगी सांगितले होते रस्त्याचे काम खराब केले तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली घाली अशा प्रकारचा विनोद आपण आपल्या भाषणातून केला होता परंतु पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली या रस्त्याचे खरंच बोगस काम झाल्यामुळे वाहनधारक चालक मालक यांची आर्थिक हानी होत असून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना गंभीर आजार होऊ शकतात, म्हणून मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद ही कंपनी खूप मोठी कंपनी आहे आपण कंपनीचा विचार न करता आपण आपल्या देशातील नागरिकांचा विचार करून या कंपनीकडून खामगाव ते पंढरपूर या रस्त्याचे नव्याने काम करून घ्यावे *या कंपनीवर कारवाई करण्या अगोदर मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांच्या वतीने आपणास विनम्र विनंती करण्यात येते* आपण या रस्त्यावरून खामगाव ते पंढरपूर प्रवास करून मगच मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीवर कारवाई करण्याबाबत विचार करावा, या रस्त्याच्या संबंधित MSRDC अधिकारी,मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्यामुळे त्यांना दिलेला पगार वसूल करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे जेणेकरून अशा प्रकारचे चुकीचे काम करण्याची हिंमत कोणी करणार नाही,कारण देशातील जनतेचा विश्वास सध्याची परिस्थिती पाहता मा.नरेंद्रजी मोदी.मा.अमितजी शहा केंद्रीय गृहमंत्री. व नितीन गडकरी यांच्या कडून जनतेला अपेक्षा आहे ही मंडळी देश हितार्थ देशासाठी तडजोड करणार नाही हा मोठा संदेश देशात पोहोचला आहे, आपल्या देशातील महापुरुष सांगून गेले परमपूज्य डॉ मा. बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितलेले आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो म्हणून खामगाव ते पंढरपूर या संपूर्ण रस्त्याचे काम खराब झाल्यामुळे मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीसोबत या रस्त्याच्या संबंधित दुसऱ्या कंपनीने काम केले असेल त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करून रस्त्याचे सिमेंट बांधकाम नव्याने करूण घेण्याबाबत कारवाई करावी कारण या रस्त्यावर वाहन गेल्यानंतर वाहनाच्या पाठीमागे धूळ उडते हि गोष्ट लक्षात घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी खासबाग म्हणजे या रस्त्यावर भेगा पडल्या खड्डे पडले ते डांबरीकरण साहित्य आणि बुजवले व बुजवणे चालू आहे या वरून लक्षात येते या रस्त्याचे काम कसे झाले असेल म्हणून कळकळीची विनंती आहे संबंधित अधिकारी बांधकाम करणाऱ्या कंपन्यावर निर्बंध घालून अधिकारी कायमस्वरूपी बडतर्फ करून कारवाई झालीच पाहिजे ही जनहितार्थ पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी पर अपेक्षा आहे.गडकरी साहेबांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या महामार्गावरील खामगाव ते पंढरपूर प्रवास करावा प्रवास करीत असताना चहा पिऊन दाखवावा मग आपल्या लक्षात येईल तसेच या रस्त्याला खड्डे भेगा पडले ते डांबरीकरण साहित्य आणि बसवायचे काम चालू आहे,*या रस्त्यावरून वाहन गेल्यानंतर धूळ उडते मग या राष्ट्रीय महामार्गाचे किती बोगस काम झाले असावे म्हणून या रस्त्याचे काम करणाऱ्या एजन्सीज मेघा इंजिनियर इन्फेक्शन लिमिटेड हैदराबाद व इतर संबंधित काम करणाऱ्या कंपन्या यांना ब्लॅक लिस्ट करून या रस्त्याच्या कामाबाबत प्रकाश सोळंके यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहे सोळंके पुढे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये या संपूर्ण रस्त्याचे काम झाले पाहिजे नाही तर या रस्त्यावर दळणवळण करणारे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील जनता या राष्ट्रीय महामार्गावर येऊन बसेल याची नोंद घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला आहे…


