
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा नगर परिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, माधव पाटील पवार, पत्रकार केशव पाटील पवार, बाळासाहेब,कतूरे यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.लोहा नगरपरिषदेच्या वतीने भाजी मंडई येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची प्रतिमा अभिवादन करण्यासाठी ठेवण्यात आली होती या वेळी लोहा शहरातील सर्व विद्यार्थी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार मोठ्या संख्येने नागरिकांनी येऊन अभिवादन केले.