
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर,: जिजाऊ जन्मोत्सव निमिताने आज देगलूर येथील जिजाऊ स्मारक चौक येथे सर्व जमाज जाती संघटन यांनी येऊन जिजाऊ वंदन करून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन केले यावेळी जिजाऊ जन्मोत्सव समिती, जिजाऊ ब्रिगेड च्या महिलां मोठ्या संख्यने उपस्थितीत संजीवनी सुर्यवंशी चैतन्या वानखेडे रंजना मानुरे शिलाताई देशाईसह थडके,जाधव, देशमुख, कदम भगिनी, जिजाऊ ब्रिगेड कार्यकरणी तसेच देगलूर तालुका व शहरातील प्रमुख मान्यवर आमदार जितेश अंतापुरकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, शिवाजी पा. देशमुख, अंकुश देशाई, प्रीतम देशाई, जनार्धन बिरादार, दिगंबर कौरावर, नामदेव थडके नाथ, हणमंत पा. बिरादार, ऍड. अंकुशराजे, ईश्वर देशमुख, डॉ. सुनिल, देविदास थडके आदीसह मोठ्या संख्यने जिजाऊंना वंदन करणेसाठी हजर होते यावेळी देगलूर शहरात मोठ्या उल्हासत भव्य शोभा यात्रेचा आयोजन असल्या बाबत सर्वांनी १४ जानेवारी सकाळी १० ते २ देगलूर शहरात होणाऱ्या भव्य शोभा यात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले…….